मागच्या भागात
( अश्वत्थामा -१ )आपण व्यास महाभारतामध्ये अश्वत्थामाबद्दल काय लिहिले आहे ते वाचले. सरला महाभारतामध्ये या बद्दल थोडी वेगळी माहिती आहे जी आपण या भागात वाचणार आहोत.
अश्वत्थामा हा एक महान योद्धा होता, तो त्याच्या काळातील महान धनुर्धारी होता आणि भीष्म, द्रोण, अर्जुन आणि कर्ण यांच्याप्रमाणे त्याच्या शस्त्रास्त्रातही दैवी शस्त्रे होती. पण दुर्योधनने त्याचा फारसा विचार केला नाही, आणि त्याच्याबद्दलच्या मताविषयीही त्याने काही लपवले नाही.
रणांगणात त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर अश्वत्थामाने पांडवांचा नाश करण्याचा प्रयत्न केला पण कृष्णामुळे तो यशस्वी झाला नाही. यामुळे दुर्योधनने त्याला
कौरवांच्या सैन्याचा सरदार सेनापती बनवण्यास नकार दिला. स्वतः अश्वत्थामाला सुद्धा यापुढे युद्धामध्ये संघर्ष करण्याची प्रेरणा नव्हती. त्यामुळे त्याने
आपल्या वडिलांचे अंतिम संस्कार केले आणि तीर्थयात्रेवर जाण्याचा संकल्प केला. युद्धामध्ये पुन्हा सामील होण्याचा मोह वाटू नये म्हणून त्याने शस्त्रे त्या योग्य माणसाला दान देण्याचा निर्णय घेतला. सहदेवाने याची कृष्णाला माहिती
दिली, कृष्णाने एका हुशार
ब्राह्मणाच्या वेषात जाऊन त्याच्याकडून शस्त्रे घेतली. जेव्हा शकुनीने अश्वत्थामाला सांगितले की कृष्णाने त्यांची फसवणूक केली आहे, तेव्हा तो अजिबात नाराज झाला नाही. उलट त्याने सांगितले कि या गोष्टीमुळे त्याला आता काही फरक पडत नाही आणि तो आता स्वतःला पूर्णपणे धार्मिक कामात गुंतवून घेईल. आणि तसेही जी शास्त्रे याला मिळाली होती ती परशुरामाकडून मिळाली होती, आणि कृष्ण परशुरामाचाच अवतार होता, त्यामुळे ज्याची शास्त्रे त्याच्याकडेच गेली तर वाईट वाटण्याचे काहीच कारण नाही.
पण जेव्हा दुर्योधन प्राणघातक जखमी झाला आहे हे कळले तेव्हा अश्वत्थामा पुन्हा एकदा रणांगणावर गेला. तो अत्यंत अस्वस्थ झाला आणि त्याने आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला घेता यावा म्हणून दुर्योधनला पुन्हा आपला सेनापती बनवण्याची विनंती केली. दुर्योधन सहमत झाला. त्यानंतर रात्रीच्या अंधारात त्याने पांडव छावणीत जाऊन धृष्टद्युम्नाचा वध केला, ज्याने त्याच्या
शोकग्रस्त, नि: शस्त्र वडिलांचा खून केला होता. झोपेत
असलेल्या द्रौपदीच्या पाच मुलांनाही त्यांनी पांडव समजून ठार मारले. दुसऱ्या दिवशी जेव्हा हे दुर्योधनाला कळले तेव्हा दुर्योधनने त्याला फटकारले आणि त्याला सेनापती बनविल्याबद्दल पश्चात्ताप झाल्याचे सांगून त्याला सेनापती पदावरून काढून टाकले. स्वतःच्या मित्राने आणि राजाने अशी बदनामी केल्यामुळे अश्वत्थामा प्रचंड व्यथित झाला.
जेव्हा हे घडले तेव्हा पांडव द्वारिकामध्ये होते. द्रौपदी शोकाकुल होती. तिला सूड हवा होता. तिने कृष्णाला अश्वत्थामाचा वध करायला सांगितले. कृष्णाने अस्वस्थमाचा वध न करता त्याची
शस्त्रे काढून घेतली. त्याने ब्राह्मणाच्या वेषात पुन्हा अश्वस्थमाची फसवणूक केली. त्याने त्याची शस्त्रे पाण्याखाली सोडण्याचा सल्ला दिला आणि रात्री त्याने चोरी केली. आणि ती शस्त्रे द्रौपदीला अर्पण केली. दुसऱ्या
दिवशी कृपाचार्यांनी हि बातमी अश्वत्थामाला सांगितली . पण यावेळी मात्र अश्वत्थामा स्वतःचा विवेक गमावून बसला. आणि जे कधीही करू नये ते त्याने केले.
त्याच्याकडे शस्त्रे नसल्यामुळे काही फरक पडला नाही. त्याने कानसिका गवत (पाण्यात वाढणाऱ्या गवताचा एक प्रकार) उखडून टाकले, त्यातून एक धनुष्य आणि बाण तयार केला आणि त्यांना सक्षम मंत्रात पवित्र केले, ज्यायोगे त्याचे योग्य धनुष्य आणि बाणात रूपांतर झाले. नंतर त्याने ब्रह्मास्त्र मंत्राचा उपयोग केला आणि पांडवांचा व कृष्णाचा त्याच्या सात पिढ्यासहित (जर त्याने मध्ये हस्तक्षेप केला तर ) नाश करण्याची सूचना देत बाण सोडला.
आणि कृष्णाने तेच केले. शेवटी पांडव त्याच्या संरक्षणामध्ये मध्ये होते. जेव्हा ब्रह्मास्त्रांचा प्रतिकार करण्यासाठी त्यांचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले, तेव्हा त्यांनी त्या विरोधात नारायण अस्त्र वापरले. या दोन शस्त्रांची विध्वंसक शक्ती इतकी महान होती की स्वत: ब्रह्मा जो स्वत: सृष्टीचा देव होता आणि ब्रह्मास्त्रांचे निर्माता देखील होता, त्याला हस्तक्षेप करावा लागला. ज्याची कल्पना अश्वत्थामा ला नव्हती. ब्रह्मदेवाने विष्णूचे शस्त्र शांत केले, पण स्वत: च्या शस्त्राला यज्ञ हवा होता - एखाद्या पांडवासारखे. म्हणून ब्रह्माने ते उत्तराच्या गर्भाशयाकडे वळवले.कृष्णाने आपली शक्ती वापरून मृत मुलांना परत जिवंत केले पण उत्तराने आपले प्राण गमावले. आणि अश्या प्रकारे हस्तिनापूरला वारस मिळाला.
त्यानंतर कृष्ण आणि त्याचा भाऊ बलराम यांनी नश्वर जग सोडले. धृतराष्ट्र , गांधारी आणि कुंती जंगलात राहायला गेले आणि जंगलाच्या एका आगीत त्यांचा नाश झाला. कालांतराने विदुर ही निधन पावले. कृष्ण गेल्यानंतर युधिष्ठिरांना शून्यतेची तीव्र भावना जाणवली आणि त्यांनी व त्यांच्या बांधवांनी लवकरच वानप्रस्थ जाण्याची वेळ निश्चित केली. युधिष्ठिराने आपल्या नातू परिक्षिताला राज्य सोपवले आणि आपल्या बंधू आणि द्रौपदी बरोबर जंगलात रवाना झाले. तिथून ते कधीही परतले नाहीत. सरला महाभारत मध्ये पुढे असे सांगितले आहे कि पांडवांच्या यात्रेच्या शेवटच्या टप्प्यात ते प्रयाग तीर्थ मधील परशुरामांच्या आश्रमात गेले, जिथे त्यांची भेट अश्वत्थामा आणि कृपाचार्य यांच्या बरोबर झाली. त्यांची ती भेट अतिशय मैत्रीपूर्ण होती. अश्वत्थामाने त्यांना आपल्याबरोबर राहण्याची विनंती केली, पण पांडवांनी
सांगितले कि त्यांची तीर्थयात्रा संपल्यानंतर परत येताना ते आश्रमात राहतील. पण त्यानंतर पांडव कधीच परत आले नाहीत.
No comments:
Post a Comment