अश्वत्थामा हा द्रोणाचार्य आणि कृपी यांचा मुलगा आहे. भगवान शंकरासारखेच पराक्रम बाळगणारा मुलगा प्राप्त करण्यासाठी द्रोणांनी अनेक वर्षांपासून भगवान शिवाची तपस्या केली. या तपस्येमुळे अश्वत्थामा चिरंजीवी बनला होता. जन्माला येतानाच अश्वत्थामा कपाळावर एक रत्न घेऊन जन्माला आला . ज्यामुळे त्याला मनुष्य प्राणी सोडून अन्य प्राण्यांपेक्षा बलवान बनवले. अश्वत्थामा वर याच मुळे भूक, तहान आणि थकवा यांचा परिणाम होत नसे.
द्रोण जरी खूप मोठे युद्ध तज्ञ असले तरी त्यांचे राहणीमान अतिशय साधे होते. त्यामुळे अश्वत्थामा चे बालपण मोठे कठीण गेले. कधी कधी तर अश्वत्थामाला दूधही मिळत नसे. आपल्या कुटुंबाला अधिक चांगले जीवन मिळावे म्हणून द्रोण पांचाळ राज्याकडे आपला माजी वर्गमित्र आणि मित्र द्रुपदाची मदत घेण्यासाठी गेला. मात्र, राजा आणि भिकारी यांची मैत्री होत नसल्याचे सांगून द्रोपाने दोस्ताचा अपमान करुन मैत्रीची निंदा केली आणि द्रोणांना हाकलून दिले. हे कळल्यानंतर कृपाचार्यांनी द्रोणांना हस्तिनापूरला बोलावून घेतले. त्यांचे युद्ध कौशल्य बघून भीष्मांनी त्यांची पांडव आणि कौरव यांचे गुरु म्हणून निवड केली.
हस्तिनापूरच्या या मदतीमुळे द्रोण आणि अश्वत्थामा नेहमी हस्तिनापूरच्या बाजूने उभे राहिले. म्हणूनच महायुद्धात त्यांनी कौरवांची बाजू घेतली.
युद्धाच्या १० व्य दिवशी जेव्हा भीष्म मृत्यूशय्येवर पडले तेव्हा दुर्योधनाने द्रोणांना आपला सेनापती म्हणून घोषित केले. द्रोणांनी वाचन दिले कि ते पांडवांना नेस्तनाबूत करतील. पण वेळो वेळी प्रयत्न करूनसुद्धा त्यांना ते शक्य झाले नाही. त्यामुळे दुर्योधनाने द्रोणांचा अपमान केला. यावेळी अश्वत्थामा आणि दुर्योधन यांच्यात सुद्धा काही वेळ खटके उडाले. पण द्रोणांनी अश्वत्थामाची समजूत काढली.
इकडे कृष्णाला माहित होते कि जो पर्यंत द्रोण आहेत तोपर्यंत कौरवांचा पराभव शक्य नाही. म्हणून त्याने भीमाला अश्वत्थामा नामक हत्तीचा वध करण्यास सांगितले आणि हि बातमी पसरवली कि भीमाने अश्वत्थामाचा वध केला. हि बातमी ऐकून गुरु द्रोण अतिशय व्यथित झाले आणि त्यांचे युद्धावरील लक्ष उडाले. हीच संधी साधून द्रुष्टद्युन्म ने द्रोणांचा वध केला
आपल्या वडिलांचा असा फसवणुकीमुळे
मृत्यू झालेला कळताच
अश्वत्थामा क्रोधाने भरला आणि पांडवांच्या विरोधात त्याने नारायणास्त्र चालवले.
हे शस्त्र जेव्हा चालविले जाते तेव्हा हिंसक वारे वाहू लागतात, ढगांचा गडगडाट ऐकू येते आणि प्रत्येक
पांडव सैनिकासाठी वेगळा बाण सुटतो . या अस्त्रामुळे पांडव सैन्य प्रचंड भयभीत झाले. परंतु कृष्णाने
सर्व सैन्याला शस्त्रे खाली ठेवून शस्त्राला शरण जाण्याचा सल्ला दिला. स्वत: नारायणाचा अवतार असल्याने त्याला शस्त्राविषयी माहिती होती, कारण शस्त्रास्त्र केवळ सशस्त्र व्यक्तीला लक्ष्य करते तर निशस्त्र व्यक्तींकडे दुर्लक्ष करते.
सैनिक निशस्त्र झाल्यानंतर ह्या अस्त्राचा प्रभाव नाहीसा झाला. त्याच प्रमाणे दैवी अवतार असल्यामुळे त्याचा कृष्ण आणि अर्जुनावर सुद्धा परिणाम झाला नाही. चिडलेल्या दुर्योधनाने अश्वत्थामा ला हे शस्त्र परत वापरण्यास सांगितले. पण हे अस्त्र परत वापरले तर त्याचा वापर कर्त्या वरच परिणाम होईल हे माहित असल्याने अश्वत्थामाने त्याला नकार दिला.
दुःशासनाच्या वधानंतर अश्वत्थामाने दुर्योधनाला हस्तिनापूरचे हित लक्षात घेऊन तहाचा सल्ला दिला होता पण दुर्योधनाने तो मान्य केला नाही. नंतर जेव्हा दुर्योधनाचा भीमाकडून वध झाला तेव्हा अश्वत्थामा, कृपा आणि कृतवर्मा हे त्याला भेटायला गेले. अश्वत्थामाने पांडवांवर सूड उगवायची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे दुर्योधनाने त्याला सैन्य प्रमुख केले.
अश्वत्थामाने कृपा आणि कृतवर्माबरोबर रात्री पांडव छावणीवर हल्ला केला. झोपेत असल्येला धृष्टद्युम्नाचा त्याने गळा दाबून वध केला. तसेच अनेक इतर योद्धांचा (शिखंडी, युध्दमानु , उत्तमौजास इ. ) त्याने त्याचबरोबर झोपेत असलेल्या द्रौपदी च्या मुलांनाही मारून टाकले. जे सैनिक पळून जाण्याच्या प्रयत्नात होते, त्यांना प्रवेशद्वारावरील कृपा आणि कृतवर्मा यांनी ठार मारले.
हा सर्व प्रकार घडला तेव्हा, पांडव तिथे नव्हते. सकाळी परत आल्यावर त्यांनी हा प्रकार बघितला आणि ते क्रोधातीत झाले. चिडून भीमाने त्याला मारण्यासाठी त्याचा शोध चालू केला तेव्हा तो व्यास मुनींच्या आश्रमाजवळ सापडला. पांडवांना बघितल्यावर अश्वत्थामाला आपल्या सुडाची आठवण झाली आणि त्याने पांडवांचा वध करण्यासाठी ब्रह्माशीर्ष
अस्त्राचा वापर केला. हे पाहुन कृष्णाने ही अर्जुनाला ब्रह्माशीर्ष अस्त्राचा चा वापर करण्यास सांगितले. या अस्त्रामुळे शत्रूवर उल्कांचा वर्षाव होत असे. हे अस्त्र एवढे शक्तिशाली होते कि, अगदी गवताच्या काडीवर सुद्धा मंत्र म्हणून त्याने हल्ला करता येत असे. असे म्हणतात कि अश्वत्थामाने गवताच्या काडीचे धनुष्य करून हे अस्त्र अर्जुनावर सोडले. दोन्ही बाजूकडून जर याचा उपयोग झाला तर पूर्ण पृथ्वीचा नाश होईल हे व्यासांनी ओळखले आणि त्यांनी दोघांना अस्त्रे मागे घेण्यास सांगितले.
कृष्णाला आणि अर्जुनाला अस्त्र मागे कसे घ्यायचे हे माहित होते. पण अश्वत्थामा याबाबतीत अनभिज्ञ होता. पण त्याने पांडवांचा वंश संपवण्यासाठी गर्भवती असलेल्या उत्तरेच्या गर्भावर अस्त्र फिरवले. त्यामुळे चिडलेल्या पांडवांनी अश्वत्थामावर चाल केली आणि त्याला मारून टाकण्याचे ठरवले. त्यावेळी तिथे असल्येला व्यासानी त्यांना अडवले आणि झालेल्या चुकीबद्दल अश्वत्थामाला त्याच्या कपाळावरील रत्न पांडवांना देण्यास सांगितले.
ते रत्न काढल्यानंतर अश्वत्थामाच्या कपाळावर खोलवर जखम झाली. कृष्णाचा राग अजूनही शांत झाला नव्हता. त्याने अश्वत्थामाला
शाप दिला कि पुढची ३००० वर्षे तो आपल्या जखमांसहित जंगलात फिरेल, आणि आपल्या मृत्यूची याचना करेल. याचबरोबर त्याला कुणीही आश्रय देणार नाही
यानंतर अश्वत्थामा जंगलात निघून गेला आणि महाभारत युद्धाचा अस्त झाला.
आजही अशी बरीच माणसे आहेत की जे सांगतात कि त्यांनी अश्वत्थामा ला बघितले आहे. मध्यप्रदेश मधील एका डॉक्टर ने मोठा विचित्र अनुभव
सांगितला आहे म्हणण्यानुसार त्याच्याकडे एक कपाळावर जखम झालेली व्यक्ती येत होती. शरीराने अतिशय धष्टपुष्ट असलेल्या त्या व्यक्तीची जखम किती आणि कशाही प्रकारची औषधे देऊन सुद्धा बरी झाली नाही. त्यामुळे एकदा चेष्टेने डॉक्टर त्या व्यक्तीला म्हणाले कि "तू अश्वत्थामा आहेस कि काय?". हे ऐकल्यावर ती व्यक्ती तिथून अदृश्य झाली. काही जण असेही सांगतात की, अश्वत्थामा आजही हिमालयाच्या पर्वतरांगामध्ये फिरत असतो आणि शिवाची आराधना करत असतो.
मित्रानो अश्वत्थामाची ही एक बाजू झाली. पण याच गोष्टीला सरल महाभारतामध्ये वेगळ्या प्रकारे सांगितले गेले आहे. ते वर्णन आपण माझ्या पुढच्या ब्लॉग मध्ये म्हणजे अश्वत्थामा-२ मध्ये वाचू शकाल.
No comments:
Post a Comment