शिखंडी
-----------
महाभारतच्या बहुसंख्य आवृत्त्यांमध्ये शिखंडीच्या पूर्वीच्या जन्मात अंबा असल्याची
कथा आहे.
शिखंडीचा जन्म मागील जन्मात अंबा नावाची
बाई म्हणून झाला होता. अंबा ही काशीच्या राजाची मोठी मुलगी होती. तिच्या बहिणींबरोबर अंबिका आणि अंबालिका यांना भीष्मांनी बळजबरीने त्यांच्या स्वयंवरातून नेले होते. हस्तिनापूर वंशास स्वयंवर कार्यक्रमास आमंत्रण न दिल्याबद्दल शिक्षा म्हणून काशीच्या राज्याला शिक्षा देण्यात आली. सौबालाचा राजा सलवा यांच्यासह अनेक राजांचा पराभव केल्यावर भीष्म राजकन्यांबरोबर फरार झाला आणि त्यांचे लग्न त्यांनी हस्तिनापूरचा राजपुत्र विचित्रवीर्य याच्याशी लावून दिले.
विचित्रवीर्यने फक्त दोन बहिणींशी लग्न केले कारण अंबाने भीष्माला सांगितले की ती सलवाच्या प्रेमात पडली आहे, आणि इतर कोणाशीही लग्न करण्यास तयार नाही. तिचे हे ऐकून भीष्माने अम्बाला सन्मानाने
सौबालाला पाठवले. परंतु भीष्माविरूद्धच्या लढाईत हार झाल्याने सलवाने तिला नाकारले. त्यानंतर अंबा भीष्मकडे परत आली आणि त्याने क्षत्रिय धर्मानुसार तिच्याशी लग्न करावे अशी मागणी केली, परंतु ब्रह्मचर्य व्रतामुळे भीष्मने तिच्याशी लग्न करायला नकार दिला. तिच्या अपमानामुळे संतप्त होऊन तिने इतर राजांना भीष्माबरोबर युद्ध करण्यास उद्युक्त करण्याचा प्रयत्न केला . पण अश्या महान योध्याबरोबर बरोबर लढण्याची तयारी कुणीही दर्शवली नाही. शेवटी परशुराम जे भीष्माचे गुरु होते ते, भीष्माची लढायला तयार झाले, पण त्यांनाही भीष्माचा पराभव करता आला नाही.
त्यानंतर तिने तपश्चर्या केली आणि भगवान कार्तिकेयांकडून तिला निळ्या कमळांचा हार मिळाला.
कार्तिकेयानी असे सांगितले कि, जो कोणी पुष्पहार धारण करील तो भीष्माच्या मृत्यूचे कारण होईल.तो हार घेऊन तो पांचाल राज्यात गेली कारण पांचाल साम्राज्य प्रचंड होते. भीष्माशी कदाचित तेच लढू शकत होते. पण भीष्माला घाबरून कोणीही तिची साथ दिली नाही. . अंबाने रागाच्या भरात राजा द्रुपदच्या वेशीवर पुष्पहार घातला आणि चिडून निघून गेली.
त्यानंतर तिने शंकराची आराधना केली आणि शंकराने प्रसन्न होऊन तिला भीष्माच्या वधासाठी आर्शिवाद दिला. पण एक स्त्री असल्यामुळे, आणि कुठल्याही प्रकाराचे युद्ध प्रशिक्षण नसल्याने तिने शंकराला हे कसे शक्य होईल असे विचारले. तेव्हा शंकराने तिला सांगितले कि हे तिचा पुढचा जन्म भीष्माच्या मृत्यूस कारणीभूत ठरेल. हे कळताच अंबा ने देह त्याग केला. ह्याच अम्बाचा जन्म द्रुपदाची कन्या शिखंदिनी म्हणून झाला. शिखंदिनी तरुण असताना, तिला राजवाड्याच्या फाटकावर टांगलेली निळ्या कमळांची माळ सापडली जी काही वर्षांपूर्वी अंबे ने लटकवली होती. शिखंदिनीने ती माळ आपल्या गळ्यात घातली . जेव्हा द्रुपदाने हे बघितले तेव्हा त्याला भीष्माचा शत्रू होण्याची भीती वाटू लागली आणि शिखंदिनीला राज्यातून काढून टाकले गेले. त्यानंतर शिखंदिनीने जंगलात तपस्या केली आणि त्याचे शिखंडी नावाच्या पुरुषात त्याचे रूपांतर झाले.
कथेच्या दुसर्या आवृत्तीत, द्रुपदला वारस नसल्यामुळे तो निराश होऊन जंगलात फिरत होता. तेव्हा त्याला चिमुकली शिखंदिनी दिसते जेव्हा द्रुपद तिला उचलतो
तेव्हा एक स्वर्गीय आवाज द्रुपदला तिला एक माणूस म्हणून वाढवण्यास सांगतो . त्यानंतर द्रुपद तिला एक मुलगा म्हणून वाढवतो, एवढेच नव्हे तर त्याचे दशर्नाच्या राजकन्येशी लग्न सुद्धा करून देतो. लग्नानंतर जेव्हा तिला कळते कि तिचा नवरा एक महिला आहे तेव्हा तिने तिचे वडील हिरण्यवर्णाकडे तक्रार केली की तिचा नवरा एक महिला आहे. जेव्हा दशर्नाच्या राजाने लोकांना हे सत्य जाणून घेण्यासाठी पाठविले तेव्हा शिखंदिनी घाबरून जंगलात पळून जाते.
जंगलात तिची भेट स्थूना नावाच्या यक्षा बरोबर झाली. कनवाळू यक्षाने तिची व्यथा ऐकून आपले पुरुषत्व तिच्या स्त्रीत्वाच्या बदल्यात देऊन टाकले. हे समजल्यानंतर आनंदित झालेल्या द्रुपदाने हा निरोप हिरण्यवर्मानाला कळवला. नेहमी संशयी हिरण्यवर्मन यांनी नंतर तरूण बायकांना शिखंडी चे पौरुषत्व तपासण्यासाठी पाठवले.
महिलांनी आपल्या राजाशी शिखंडीच्या
पुरुषत्वाची पुष्टी केली. आणि त्यानंतर शिखंडी आपल्या घरी परत गेला.
महाभारताच्या दहाव्या दिवशी, अर्जुनाने आपल्या रथावर शिखंडीला बसवले आणि तो भीष्मावर चालून गेला. रथावर शिखंडीला बघून भीष्माने स्त्रीवर शस्त्र चालवण्यास नकार दिला आणि आपली शस्त्रे खाली ठेवली . ती वेळ साधून अर्जुनाने भीष्मावर बाणांचा वर्षाव केला आणि त्याला मृत्यूशय्येवर झोपवले. या प्रकारे शिखंडी ने आपला सूड उगवला.
शिखंडीचा मृत्यू कसा झाला याविषयी काही मते आहेत. काही जण म्हणतात कि दहाव्या दिवशीच शकुनी, दुःशासन आणि अश्वत्थामा ने त्याचा वध केला. कारण दहाव्या दिवसानंतर शिखंडी कुठेही दिसला नाही. काही ठिकाणी असेही लिहिले आहे कि त्याचा वध
अठराव्या दिवशी अश्वत्थामा कडून झाला