Friday, May 1, 2020

इरावण - महाभारतातील एक पात्र


इरावण (इरावट, नागार्जुन,  इरावंत) हे  महाभारतातील एक लहान पात्र आहे. इरावण हा पांडव राजपुत्र अर्जुनाचा आणि नागा राजकन्या उलुपी यांचा  पुत्र इरावण कुत्तांतावरच्या पंथातील मध्यवर्ती देवता आहे आणि त्याला त्याच  नावाने या पंथात ओळखले जाते. याच बरोबर कुत्तांतवर  द्रौपदीच्या पंथात सुद्धा  मुख्य भूमिका बजावतो . हे दोन्ही पंथ तामिळ वंशाचे आहेत, जेथे त्याला गाव देवता म्हणून पूजले जाते आणि त्याला अरावण म्हणून ओळखले जाते.एवढेच नव्हे तर  तो थिरुन्गायी (तामिळमधील अरावानी आणि दक्षिण आशियामध्ये हिजडा ) नावाच्या सुप्रसिद्ध समुदायाचे संरक्षक देव देखील आहे.


महाभारताने इरावणला  कुरुक्षेत्र युद्धाच्या वेळी मृत्यू आला असे वर्णन केले आहे. तथापि, यापेक्षा वेगळी माहिती दक्षिण भारतात आढळती. जी तामिळी महाभारत "पराटा वेंपा " या मध्ये आढळून येतात. त्याप्रमाणे, कुरुक्षेत्र युद्धाच्या अगोदर, पांडवांनी विजयी होण्यासाठी कालीला नरबळी द्यायचा होता. पण त्या साठी अशी व्यक्ती हवी होती ज्याला  सर्व 32 लक्षनाम (नैतिक वर्ण) असतील. पांडवांकडे त्यावेळी फक्त  तीन लोक  या अटींमध्ये बसत होते. कृष्णा, अर्जुन आणि इरावण .त्यापैकी इरावण बळी जाण्यास तयार झाला पण त्याने त्यासाठी कृष्णाकडे तीन वरदान मागितली. इरावण  ने मागितलेला पहिला वर होता विवाहित होऊन मृत्यू होण्याचा. त्याची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी कृष्णाने स्वतः मोहिनीचे रूप घेऊन त्याच्याबरोबर लग्न केले. तंजावूर मध्ये असेही म्हणले जाते कि , इराण चे लग्न कृष्णाचा भाऊ सात्यकी याच्या मुलीबरोबर लावले गेले. लग्नानंतर दुसऱ्या दिवशी यज्ञ करून इरावण चा बळी दिला गेला. आणि त्याचे ३२ भाग करून काली मातेला अर्पण केले. प्रसन्न होऊन कालीमातेने पांडवांना यशस्वी होण्याचा आशीर्वाद दिला. कुत्तांतवर पंथ याच गोष्टीवर आधारित आहे.

द्रौपदीच्या पंथानुसार असे सांगितले जाते, कि कृष्णाने जो दुसरा वर दिला त्यामुळे इरावणने पूर्ण युद्ध त्याच्या छाटलेल्या डोक्याने बघितले. त्यासाठी युद्धभूमीवर एक स्तंभ उभा करून त्याला इरावण चे डोके लटकावले गेले.  युद्धा नंतर, जेव्हा पांडव त्यांच्या विजयाची चर्चा करीत होते, तेव्हा भीमाला स्वत: चा मोठा अभिमान वाटत होता . इरावण पांडवांना सांगतो की पांडवांना मिळालेला विजय दोन गोष्टी मुले आहे, एक, हे कृष्णाचे चक्र आणि दुसरी द्रौपदी जिने देवीचा अवतार घेऊन शत्रूचे रक्त पिले. असे सांगितले जाते, कि यामुळे अपमानित होऊन भीम इरावण च्या मुंडक्याकडे धावून गेला . पण तितक्यात अर्जुनाने इरावण चे डोके काड्यानी भरलेल्या नदीत फेकून दिले, ज्यातून नंतर एक बालक जन्माला आले. एका शिकारीसाठी आलेल्या राजाला हे बालक सापडले आणि त्याने त्याचा सांभाळ केला. कालांतराने ह्याच मुलाने कुट्टकरन नावाच्या राक्षसाचा वध केला, ज्याला असं वरदान होते कि फक्त काड्यानी तयार झाल्येला व्यक्ती कडून त्याचा वध होईल.

त्या मुलाला आता कुत्तांतवर असे म्हटले जाते आणि तमिळनाडूच्या कुवागममध्ये त्याचे मंदिर आहे.इरावण ला मिळालेलं तिसरं वरदान असे होते, कि बळी गेल्यानंतर, इरावण पुन्हा जिवंत होईल आणि त्याचा रणांगणात  तेजस्वी मृत्यू होईल. या वरदानानुसार, इरावण पुन्हा जिवंत होतो आणि दानव अलंबुशाच्या हातून मारला जातो. महाभारत काव्यामध्ये इरावण वधाची रंजक कहाणी आहे. इरावण हा अर्जुनाच्या दुसऱ्या पत्नी पासून झाल्यामुळे त्याला सुरवातीला त्याला अर्जून वंशामध्ये मानले जात नसे. पण मोठा झाल्यानंतर इरावण आपल्या वडिलांबरोबर पुन्हा एकत्र येण्यासाठी इंद्रप्रस्थ ला येतो. त्यावेळी अर्जुन त्याला कुरुक्षेत्र युद्धात मदत करायची विनंती करतो.इरावण  युद्धात मोठा पराक्रम गाजवतो . श्रुतयूष ,  विंदा,अनुविंदा या सारख्या वीरांना त्याने  पराभूत केले. त्यानंतर त्याच्यावर चालून आलेल्या  गांधार राजपुत्र, राजा सुवालाचे पुत्र, शकुनीचे लहान भाऊ, आर्जव आणि सुका या सर्वाना त्याने ठार केले. फक्त वृषव बचावला. चिडलेल्या दुर्योधनाने शेवटी आलंबुषा याला इरावण ला ठार मारण्याचा आदेश दिला. या लढाईत मोठ्या प्रमाणात भ्रम अस्त्राचा वापर झाला. इरावण ने अलंबुषाचें धनुष्य मोडून, अलंबुषाचे अनेक तुकडे केले. पण अलंबुषाचे शरीर पुन्हा जोडले गेले. हे बघून इरावण ने शेष सर्पाचे रूप धारण केले आणि त्याच्या सैन्याने सर्पाचे. हे बघून अलंबुषा गरुडाचे रूप धारण करतो आणि इरावण चा वध करतो.

आज इरावण ची  ३२ देवळे तामिळनाडू मध्ये आहेत. बऱ्याच ठिकाणी द्रौपदी च्या देवळामध्ये इरावण चे डोके कोपऱ्यात किंवा टोकावर ठेवले जाते. यामुळे इतर आत्म्यापासून रक्षण केले जाते असा समज आहे.











6 comments:

  1. Hi Mandar, kindly share your email id. or you can just send a test email on my email id jatinbabbar1@gmail.com

    Regards

    jatin

    ReplyDelete
  2. Hi Mandar, do you have blogs in english or hindi somewhere.thanks

    Regards
    Vishal

    ReplyDelete
  3. Hi Mandar, do you have blogs in english or hindi somewhere.thanks

    Regards
    Vishal

    ReplyDelete
  4. Hi Mandar, do you have blogs in english or hindi somewhere.thanks

    Regards
    Vishal

    ReplyDelete
    Replies
    1. Hi vishal..
      Not as if now. But i will start it soon.

      Delete