Monday, May 4, 2020

उलुपी : अर्जुनाची दुसरी पत्नी


उलुपी
------
आज आपण महाभारतामधल्या अजून एका  पात्राबद्दल बद्दल जाणून घेणार आहोत जिचे नाव आहे उलुपी. उलुपी ला महाभारतात बऱ्याच नावाने ओळखले जाते. भुजगात्मजा, भुजगेंद्रकन्यका, भुजगोत्तमकौरवीं, कौराव्यादुहिता, कौराव्याकुलनंदिनी, पन्नागनंदिनी, पन्नागसुता, पन्नागात्मजा, पन्नागी, पन्नगेश्वरकन्या अशी तिची बरीच नावे आहेत. 
उलुपी हि कौरव्याची कन्या, जो नागा राज्याचा  राजा होता. अर्जुनाला एकूण चार पत्नी होत्या. त्यापैकी उलुपी ही दुसरी पत्नी. महाभारत सोडून, विष्णू पुराण आणि भागवत पुराणामध्ये सुद्धा तिचा उल्लेख आढळतो.

असे म्हणतात की, जेव्हा वनवासात होता तेव्हा उलुपीने अर्जुनाची भेट घेतली त्याच्याबरोबर लग्न केले. त्या दोघांचा मुलगा म्हणजेच इरावण ज्याच्याबद्दल आपण https://mythological-facts.blogspot.com/2020/05/blog-post_1.html इथे पूर्ण माहिती दिली आहे.
अर्जुनचा चित्रांगडी पासून झालेला मुलगा, बाबरुवहान याचा सांभाळ सुद्धा उलूपीने केला होता . बाबरुवहानाने युद्धात मारले गेल्यानंतर वसुच्या श्रापातून अर्जुनाची सुटका करुन घेण्यासाठी तिचे श्रेयही तिला देण्यात आले. असे म्हणतात कि जेव्हा शिखंडीला पुढे करून अर्जुनाने भीष्मांवर हल्ला केला, तेव्हा चिडून वसू नी अर्जुनाला नरकात जाण्याचा शाप दिला. नंतर जेव्हा अश्वमेध पर्वा मध्ये अर्जुन बाबरुवहान समोर आला, तेव्हा उलूपीने बाबरुवहान ला अर्जुनाबरोबर युद्ध करण्यास सांगितले. युद्धात बाबरुवहान ने अर्जुनाला ठार मारले. त्यानंतर उलुपी ने बब्रूवाहन ला नागमणी दिला, जो वापरून त्याने अर्जुनाला पुन्हा जीवित केले.

उलुपी आणि अर्जुन यांचा संबंध कसा आला याचीही कहाणी मोठी रंजक आहे. वनवासात असताना अर्जुनाला एकदा ब्राह्मणांच्या रडण्याचा आवाज आला. अर्जुनाने चौकशी केल्यावर समजले कि त्यांच्या गाई कुणीतरी चोरून नेल्या आहेत.  त्यावेळी अर्जुनाने त्यांना त्यांच्या गाई परत मिळवून देण्याचे वाचन दिले. पण अर्जुनाची शस्त्रे मात्र युधिष्ठिराच्या दालनात होती. पण जेव्हा अर्जुन दालनात गेला तेव्हा युधिष्ठिर आणि द्रौपदी एकांतवासात होते. नियमाप्रमाणे अर्जुनाला आत प्रवेश करता येत नव्हता. पण परिस्थितीमुळे अर्जुनाने आत प्रवेश करून पटकन आपली शस्त्रे घेतली आणि चोरांपासून गाई परत मिळवल्या. परत आल्यानंतर अर्जुनाने युधिष्ठीर ला सांगितले कि त्याच्याकडून झालेल्या चुकीमुळे त्याला महाल सोडण्याची आज्ञा व्हावी आणि आशीर्वाद मिळावा. युधिष्ठिर च्या खूप समजावणीनंतर सुद्धा, अर्जुनाने महालाचा त्याग केला.  आणि अज्ञात वासात निघून गेला. याच काळात जेव्हा तो गंगेमध्ये स्नान करत होता तेव्हा तो गंगेमध्ये ओढला गेला. हे काम केले होते उलुपी ने. उलूपीने अर्जुनाला एका हिऱ्यानी मढवलेल्या राजमहालात नेले. आणि त्याच्या बरोबर लग्न करण्याची उच्च व्यक्त केली. पण अर्जुनाने तिला आपण द्रौपदी शी एकनिष्ठ असून, एका वैराग्याचे आयुष्य जगत असल्याचे सांगितले आणि तिच्या विनंतीला नकार दिला. पण उलूपीने सांगितले कि अर्जुनाने लग्न केल्यास ती तिच्या जीवाचा त्याग करेल. म्हणून अर्जुनाने अखेरीस तिच्याशी लग्न केले.

जेव्हा पांडवांनी आपल्या राज्याचा त्याग करून हिमालयाची परिक्रमा केली तेव्हा उलुपी आपल्या राज्यात परत गेली


No comments:

Post a Comment